सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८२
‘बिया पेरण्यापूर्वी त्यांवर बीजसंस्कार करणे आवश्यक असते. बीजसंस्कार करण्यासाठी बीजामृताचा उपयोग करतात. बीजसंस्कारांमुळे पुढील लाभ होतात.
१. बियांची उगवण्याची क्षमता वाढते.
२. बियांवरील हानीकारक रोगाणू मरतात किंवा निष्क्रीय होतात.
३. अकस्मात् पालटणारे तापमान किंवा ढगाळ हवामान यांमुळे होणार्या बुरशीजन्य रोगांपासून रोपाचे रक्षण होते.
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.२.२०२३)
बीजामृताविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मार्गिका (लिंक) पुढे दिली आहे.१. ‘बीजामृत कसे बनवावे ?’, हे समजून घेण्यासाठी मार्गिका : https://www.youtube.com/watch?v=SPw6aWC6Kqg २. ‘बीजसंस्कार कसे करावेत ?’, हे समजून घेण्यासाठी मार्गिका : https://www.youtube.com/watch?v=lRQlNBeSz2o |