वेलवर्गीय भाज्‍यांची उत्तम वाढ होण्‍याकरता वेलीसाठी मांडव करावा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७७

वेलीसाठी मांडव

‘दुधी, कारले, पडवळ इत्‍यादी वेलवर्गीय भाज्‍या लावल्‍यावर त्‍यांची उत्तम वाढ होण्‍यासाठी वेल उंचावर चढवणे आवश्‍यक असते. मांडव केल्‍यास वेल व्‍यवस्‍थित पसरून तिला अनेक फांद्या येतात आणि परिणामी अधिक उत्‍पन्‍न मिळते.

सौ. राघवी कोनेकर

त्‍यामुळे वेल चढवण्‍यासाठी मांडव करावा. ‘हा मांडव सिद्ध करण्‍याची सोपी पद्धत कोणती ?’, हे जाणून घेण्‍यासाठी पुढे दिलेल्‍या संगणकीय मार्गिकेवरील लेख वाचावा.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा. (३०.१.२०२३)

मांडव करण्‍याची पद्धत समजून घेण्‍यासाठी संगणकीय मार्गिका
https://sanatanprabhat.org/marathi/644805.html