कुंडीतील मुंग्‍या घालवण्‍याचा सोपा उपाय !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७४

‘कुंडीत काही वेळा पुष्‍कळ मुंग्‍या होतात. खरेतर मुंग्‍या झाडांना काहीच अपाय करत नाहीत. उलट त्‍यांच्‍या हालचालीने घट्ट झालेली माती भुसभुशीत होऊन झाडाला लाभच होतो. मुंग्‍या काळ्‍या असतील, तर काहीच उपद्रव नसतो; परंतु लाल मुंग्‍या आपल्‍याला काम करतांना चावून त्रास होऊ शकतो.

सौ. राघवी कोनेकर

असे असले, तरीही मुंग्‍या हा निसर्गाच्‍या अन्‍नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन शक्‍यतो विषारी औषधे घालून त्‍यांना मारू नये. हळद, कापूर, दालचिनी यांपैकी जी पूड घरात उपलब्‍ध असेल, ती साधारण १ – २ चहाचे चमचे कुंडीत आणि कुंडीखाली पसरून घालावी. या पदार्थांच्‍या उग्र वासाने मुंग्‍या निघून जातात.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.१.२०२३)

तुम्‍हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्‍हाला कळवा !
ई-मेल : [email protected]