देहली येथील पू. संजीव कुमार (वय ७२ वर्षे) आणि पू. (सौ.) माला कुमार (वय ६८ वर्षे) यांच्‍या संत सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी संतांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये !

देहली आणि उत्तर भारतातील काही राज्‍ये (हरियाणा आणि पश्‍चिमी उत्तरप्रदेश) यांत सनातन संस्‍थेचे जे कार्य वाढीस लागले आहे, ते संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्‍यामुळे ! त्‍यांची पुढील प्रगती आणि कार्य अधिक जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे !’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.७.२०२३) (महर्षींच्‍या आज्ञेनुसार डॉ. जयंत … Read more

सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या सनातनच्‍या संत पू. (श्रीमती) आशा भास्‍कर दर्भेआजी यांचा कोल्‍हापूर येथे देहत्‍याग !

देहत्‍याग करण्‍यापूर्वी अनुमाने १५ दिवस त्‍यांचे खाणे-पिणे अत्‍यल्‍प झाले होते; मात्र त्‍याही स्‍थितीत त्‍या अगदी शांत होत्‍या. त्‍यांच्‍या देहत्‍यागानंतर त्‍या ज्‍या खोलीत होत्‍या, ती खोली आणि घर येथील चैतन्‍य अन् प्रकाश यांत वाढ झाली होती.

‘साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू इत्‍यादी सर्वांची साधना व्‍हावी’, यांसाठी ‘स्‍व’भान विसरून सतत प्रयत्नरत असलेल्‍या सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३४ वर्षे) !

‘गुरुकृपेने मला सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संत पू. दीपाली मतकर यांचा सहवास लाभला. त्‍यांच्‍या समवेत रहातांना मला त्‍यांची समष्‍टीप्रती असलेली तळमळ प्रकर्षाने जाणवली. त्‍यांच्‍याविषयी माझ्‍या लक्षात आलेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक गुरुमाऊलींच्‍या चरणी अर्पण करत आहे.

देवाविषयी दृढ श्रद्धा आणि सूक्ष्मातून कळण्याची क्षमता असलेला पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

अधिक श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१८ जुलै २०२३) या दिवशी सातारा रस्‍ता (पुणे) येथील बालसाधक कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याने ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी प्राप्‍त केल्‍याचे घोषित करण्‍यात आले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जाहीर सभांच्‍या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी केलेल्‍या विविध सेवा

आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍मप्रचार दौरा आणि अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करतांना पू. शिवाजी वटकर यांनी सहसाधकांचे मिळालेले मोलाचे साहाय्‍य’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत. 

श्रीरामाच्‍या अखंड अनुसंधानात आणि नामस्‍मरणात डुंबलेल्‍या ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७५ वर्षे) !

श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ३८ वर्षे) यांना जाणवलेली पू. (श्रीमती) मुंगळे यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडून पू. शिवाजी वटकर यांच्या जीवनात फुलू लागलेला आनंद !

या भागात पू. वटकर यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यावर त्यांना मिळू लागलेला आनंद यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

श्री. प्रकाश मराठे यांना पत्नी पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे

पू. (सौ.) शालिनी मराठे यांचे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या देहावसानानंतर अन् त्‍यांना संत घोषित केल्‍यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.