श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सप्तर्षी आणि संत यांचे संदेश
‘श्री रामललाच्या भव्य मंदिरामुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त झाले आहे. आता आपल्याला भारताचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याकडे पाहिले जाते. प्रभु श्रीरामाच्या काळात संपूर्ण प्रजा धर्मपालक आणि रामभक्त होती; म्हणून तिला श्रीरामासारखा धर्मपालक राजा अन् रामराज्य मिळाले. भारतालाही पुनश्च रामराज्यासम गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु समाजाला धर्मपालन आणि रामभक्ती करून आध्यात्मिक बळ वाढवावे लागेल.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी)