भगवान श्रीविष्णूच्या देहातील सप्तस्थाने असलेली भारतातील सात मोक्षनगरे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘अयोध्या’, मथुरा, मायापुरी (हरिद्वार), काशी (वाराणसी), कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन) आणि द्वारका ही भारतातील सात मोक्षनगरे आहेत. यामध्ये ‘अयोध्या’ अग्रस्थानी आहे.

आपल्या महान ऋषीमुनींनी भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय देहाचे पुढील वर्णन केले आहे, ‘भगवान श्रीविष्णूच्या देहातील सप्तस्थाने, म्हणजे ही सात नगरे आहेत. ‘अयोध्या’ हे श्रीविष्णूचे मस्तक आहे. ‘काशी (काशीपुरी)’ ही श्रीविष्णूची नासिका आहे. ‘मथुरानगरी’ श्रीविष्णूचे कंठस्थान आहे, तर ‘मायापुरी (हरिद्वार)’ हे श्रीविष्णूचे हृदयस्थान आहे. ‘द्वारकापुरी’ ही श्रीविष्णूचे नाभीस्थान असून तमिळनाडूतील ‘कांचीपूरम्’ येथील ‘शिवकांची’ आणि ‘विष्णुकांची’ ही स्थाने म्हणजे श्रीविष्णूच्या जंघा आहेत. सातवी मोक्षनगरी ‘अवंतिकापुरी (उज्जैन)’ हे भगवान श्रीविष्णूचे चरणस्थान आहे. ऋषीमुनींच्या या वर्णनातून भारताचे अलौकिक महत्त्व लक्षात येते.

‘पूर्वसुकृतामुळे मनुष्यजन्म मिळून श्रीविष्णूची भक्ती करता येणे आणि श्रीविष्णूच्या कृपेने श्रीगुरूंची भेट होऊन मोक्षप्राप्तीसाठी साधना करणे’, यांपेक्षा मनुष्याचे मोठे भाग्य कोणते ?’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२०.१.२०२४)