दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वाविषयी अतिशय स्पष्ट विचार मांडले जातात ! – पू. भास्करगिरि महाराज, मठाधिपती, दत्त देवस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिनांक १२ आणि १३ मार्च या दिवशी नगर जिल्ह्यातील देवगड येथे नगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ विषयीची संतवाणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरप्राप्ती, संस्कार आणि अध्यात्म या मार्गाने हिंदूंना हिंदु राष्ट्रापर्यंत घेऊन जात आहेत. यामध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रवास खडतर आहे, तरीही कुठेही न डगमगता दैनिकाचा प्रवास चालू आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात हे दैनिक गेले पाहिजे, तरच धर्मजागृती व्यवस्थित होईल !

आपत्काळातील दीपस्तंभरूपी मार्गदर्शक सनातन प्रभात !

तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका ‘सनातन प्रभात’ समूह पार पाडील. अशा घटनांकडे ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन समाजाला घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सण-उत्सव यांविषयीची माहिती शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना सांगणारे श्री. संतोष वर्तक !

‘‘हे दैनिक राष्ट्र, धर्म, देवता यांविषयीच्या माहितीचे ज्ञानभांडार आहे. यातील वृत्ते वस्तूनिष्ठ असतात. अभ्यासक्रमात शिकवले न जाणारे राष्ट्र-धर्म विषयीचे मार्गदर्शन यातून मिळते. आजच्या पिढीत राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम जागृतीचे कार्य दैनिक करत आहे.’’

सत्ययुगाचा प्रारंभ करील सनातन प्रभात !

देवा, तुझे किती आभार, सुंदर हे सनातन प्रभात सनातन प्रभात ।
पहाटे पहाटे येतो, गुरूंचा प्रसाद ।।

शब्द न् शब्द, ओतप्रोत दैवी अद्भुत !

निव्वळ रकाने रतीब मजकूर नव्हे; साक्षात पाझरे भगवंत लेखणी ।
जैसे श्रीफळ कोंदणातील मधुर पाणी ।

वाचकांच्या दृष्टीकोनातून असे आहे ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गोहत्या, धर्मांतर, औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन, अग्निहोत्र, भाषाशुद्धी, शिक्षण, महान हिंदु संस्कृती यांवर आणि सर्वांगाने विचार करणारे लिखाण प्रसिद्ध होत असते.

हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सामग्री उत्तम आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी असते. आजही ‘गुगल’ या ‘सर्च इंजिन’ला उत्तम आणि मूळ सामग्रीची प्रचंड आवश्यकता असते. अशा वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’ कुठलेही तांत्रिक आणि महागडे ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ न वापरता वरच्या स्थानावर आहे. हे या दैनिकातील उत्तम आणि मूळ सामग्रीचे यश आहे !

‘माझा मृत्यू झाला, तरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू ठेवा’, असे यजमानांना सांगणार्‍या कर्जत (जिल्हा रायगड) येथील दिवंगत गद्रेआजी ! – सौ. अश्विनी कदम, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या साधक वितरक, रायगड

सनातनच्या साधकांना गुरुपौणिमेचे अर्पण द्या’, असे सांगितल्याचे गद्रेआजोबा म्हणाले. श्री. गद्रेआजोबा नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात.

जीवनातील विविध प्रसंगांत मार्गदर्शन मिळाल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या दैवी शक्तीची आलेली प्रचीती !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून नेहमीच साधना, अध्यात्म, राष्ट्र-धर्मविषयीचे मार्गदर्शन मिळत असते. त्याचा व्यावहारिक आणि सामाजिक स्तरावर मला वेळोवेळी उपयोग झाला आहे.