दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सण-उत्सव यांविषयीची माहिती शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना सांगणारे श्री. संतोष वर्तक !

श्री. संतोष वर्तक हे मागील १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. कळंबोली (रायगड) येथील सह्याद्री शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष, तसेच ‘गौरव क्लासेस’चे संचालक आहेत. शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना ते ‘सनातन प्रभात’मधील सण-उत्सवांविषयीची माहिती सांगतात.

श्री. संतोष वर्तक

‘सनातन प्रभात’विषयी ते म्हणाले, ‘‘हे दैनिक राष्ट्र, धर्म, देवता यांविषयीच्या माहितीचे ज्ञानभांडार आहे. यातील वृत्ते वस्तूनिष्ठ असतात. अभ्यासक्रमात शिकवले न जाणारे राष्ट्र-धर्म विषयीचे मार्गदर्शन यातून मिळते. आजच्या पिढीत राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम जागृतीचे कार्य दैनिक करत आहे.’’