शब्द न् शब्द, ओतप्रोत दैवी अद्भुत !

निव्वळ रकाने रतीब मजकूर नव्हे; साक्षात पाझरे भगवंत लेखणी ।
जैसे श्रीफळ कोंदणातील मधुर पाणी ।
कसदार लेख, जागोजागी उपयुक्त टिपणी ।
अन् सर्वोच्च मानबिंदू अशी, तेज:पुंज संपादकीय कानउघाडणी ।।

पामरांचे शब्द पडतील थोडके ।
करण्या अशा दैनिकाची वाखाणणी ।
नाही केवळ वरकरणी, ओळ अन् ओळ, शब्द न् शब्द, ओतप्रोत दैवी अद्भुत ।।

‘सनातन प्रभात’ची ओळख लौकिकार्थाने ‘वृत्तपत्र’ अशी असली, तरी खर्‍या साधकांच्या दृष्टीने हे वेदमंत्राएवढेच पवित्र असे ईश्वरी मुखपत्र आहे, हे नि:संशय !  आत्मिक आणि आध्यात्मिक प्रबोधनासाठी याचे नियमित वाचन, हीच खरी साधना ! दैनिक ‘सनातन प्रभात’ला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !

– प्रा. समीर वेलणकर, मुलुंड, मुंबई