राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्‍ट्र-धर्म यांच्‍याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्‍या हिंदु बांधवांना आवाहन !

‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नव्‍हे, तर आध्‍यात्‍मिक पत्रच ! – सचिन कुलकर्णी

साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र ! – योगेश तुरेराव, संपादक, दैनिक ‘अग्रणी वार्ता’

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी आवश्‍यक वातावरण निर्माण करण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र आहे. धर्मशिक्षणाची आवश्‍यकता ओळखून ‘सनातन प्रभात’ने ते वृत्तपत्रातून देण्‍याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईत साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिनी ‘वॉल मॅग्‍झिन’वर वाचकांनी नोंदवले अभिप्राय !

‘सनातन प्रभात’ ‘घरोघरी ‘सनातन प्रभात’ असायला हवा’, ‘वृत्तपत्र नव्‍हे, सर्वांचा परममित्र’, ‘सनातन प्रभातमुळे मुलांवर धर्मसंस्‍कार, धर्माचरण यांचे संस्‍कार झाले’, ‘अतिशय छान’, ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचे ध्‍येय’, ‘भक्‍त आणि भगवंत यांमधील दूत’ अशा शब्‍दांत वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी अभिप्राय नोंदवला.

राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे ‘सनातन प्रभात’ होय ! – अधिवक्‍ता समीर पटवर्धन

सनातन प्रभातचे वाचक हे केवळ वाचक नसून तो भगवंताशी जोडलेला जीव आहे. राष्‍ट्र-धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे सनातन प्रभात होय, असे प्रतिपादन अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी केले.

‘सनातन प्रभात’ हेच सनातन हिंदु धर्माचे खरे मुखपत्र ! – हनुमंत कारेकर, विश्‍वस्‍त, रामदिघी मंदिर, चिमूर

हिंदु धर्माच्‍या पुनर्स्‍थापनेसाठी ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. त्‍यामुळे ते सनातन धर्माचे खरे मुखपत्र आहे, असे विचार चिमूर येथील रामदिघी मंदिराचे विश्‍वस्‍त तथा साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हनुमंत कारेकर यांनी व्‍यक्‍त केले. १९ ऑगस्‍ट या दिवशी येथे साप्‍ताहित ‘सनातन प्रभात’चा रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.

अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

सनातनचा हात धरा म्हणजे कुणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा पुणे येथे उत्साहात साजरा !

२५ वर्षे विविध चळवळींच्या माध्यमातून समाजाला जागृत करणारे ‘सनातन प्रभात’ ईश्‍वरनिर्मित असल्याने भावी काळातही ‘सनातन प्रभात’ची मशाल प्रज्वलितच राहील !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी प्रामुख्याने समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि समाजामध्ये धर्मजागृती व्हावी, यांसाठी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ चालू केले.

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ची रौप्य महोत्सवी वाटचाल !

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ने २५ वर्षे पूर्ण केली आहेत. राष्ट्र आणि धर्म हिताच्या ज्या महन्मंगल उद्देशाने ते चालू झाले, त्याचे सिंहावलोकन करण्याची ही वेळ आहे आणि अर्थातच त्याच्या उद्देशाचे सार्थक झाल्याचे लक्षात येत आहे.