‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नव्‍हे, तर आध्‍यात्‍मिक पत्रच ! – सचिन कुलकर्णी

साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साप्‍ताहिक‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिन सोहळ्‍यात मनोगत व्‍यक्‍त करतांना श्री. सचिन कुलकर्णी

कोल्‍हापूर – मी गेली अनेक वर्षे ‘सनातन प्रभात’चा वाचक असून कार्यालय आणि घर येथे हे वृत्तपत्र वाचण्‍यास ठेवले आहे. सनातन प्रभात वाचण्‍यास प्रारंभ केल्‍यापासून कार्यालय आणि घर येथील वातावरण पालटत आहे. ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून पुढच्‍या पिढीला सण, उत्‍सव कशा प्रकारे साजरे करावे, याचे ज्ञान मिळते, त्‍यामुळे ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नव्‍हे, तर आध्‍यात्‍मिक पत्रच आहे. त्‍यातून जी ऊर्जा मिळते त्‍या ऊर्जेच्‍या बळावर आम्‍ही दिवसभर कार्य करू शकतो, असे गौरवोद़्‍गार ‘मास्‍टर सर्व्‍हिसेस’ या आस्‍थापनाचे मालक श्री. सचिन कुलकर्णी यांनी काढले. ते साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍य महोत्‍सवी सोहळ्‍यात वक्‍ता म्‍हणून बोलत होते. हा सोहळा २६ ऑगस्‍टला झाला. ‘सनातन प्रभात’चे श्री. राहुल कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. या सोहळ्‍यासाठी सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब आणि पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्‍यासह १४० जण उपस्‍थित होते.

दीपप्रज्‍वलन करतांना डावीकडून श्री. राहुल कदम, श्री. सचिन कुलकर्णी आणि श्री. किरण दुसे
साप्‍ताहिक‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिन सोहळ्‍यात वेदमंत्रपठण करतांना वेदमूर्ती स्‍वप्‍नील जोशी

उपस्‍थित मान्‍यवर : ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे जिल्‍हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, श्री. सतीश पाटील, श्री. नितीन चव्‍हाण, अधिवक्‍ता संजय पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर, उद्योजक श्री. शरद शेटे, श्री. रवींद्र ओबेरॉय

साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिन सोहळ्‍यासाठी उपस्‍थित संत, मान्‍यवर, हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि वाचक

असा झाला ‘सनातन प्रभात’चा सोहळा

प्रारंभी कोल्‍हापूर जिल्‍हा ब्राह्मण पुरोहित संघाच्‍या सहकार्याने वेदमूर्ती स्‍वप्‍नील जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. ‘सनातन प्रभात’साठी वितरक म्‍हणून सेवा करणार्‍या विविध वितरकांचा सत्‍कार झाल्‍यावर सनातन प्रभातच्‍या वाचक सौ. स्नेहल नवरे, सौ. स्नेहा भोसले, भाजपचे चंदगड विधानसभा विस्‍तारक श्री. संदीप नाथबुवा यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले, तर डॉ. मोहन गवळी, प्राध्‍यापक डॉ. सूर्यकांत मेटकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक श्री. यशवंत कुलकर्णी या वाचकांनी उत्‍स्‍फूर्तपणे मनोगत व्‍यक्‍त केले.

साप्‍ताहिक‘सनातन प्रभात’च्‍या वर्धापनदिन सोहळ्‍यात वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी व्‍यक्‍त केलेले विचार लावलेला फलक पहातांना वाचक

विशेष

१. एका वाचकाने उत्‍स्‍फूर्तपणे कार्यासाठी अर्पण केले.

२. गडहिंग्‍लज आणि मलकापूर येथूनही वाचक आले होते. काहीजण साप्‍ताहिक वर्गणीदार झाले.

श्री. सचिन कुलकर्णी – ‘सनातन प्रभात’ आमच्‍या कार्यालयात चालू झाल्‍यापासून आमच्‍या भोवती संरक्षण कवच निर्माण झाले आहे, असे आम्‍हाला वाटते.