फोंडा (गोवा) येथील साधिका सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक यांनी शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेली गुरुपौर्णिमा ही आमची साधनेत आल्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा होती.  त्या वेळी आम्ही मडकई (गोवा) येथील श्री. हेमंत काळे यांच्या घरी कापडी फलक (बॅनर) बनवणे, सत्संगात जाणे आदी सेवा करायचो.

रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना साधिकेला अन्नपूर्णामाता श्री दत्तात्रेयांना भिक्षा देत असल्याचे दृश्य दिसून देवाने सूक्ष्मातून त्याचा अर्थ सांगणे

२.५.२०१९ या दिवशी दुपारी मी रामनाथी आश्रमात प्रवेश करत असत असतांना मला ‘श्री अन्नपूर्णामाता श्री दत्तात्रेयांना भिक्षा देत आहे’, असे दृश्य दिसले.

शारीरिक त्रास होत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या शरिरात असणार्‍या देवीतत्त्वाचे साहाय्य घेणे आणि देवीच्या चैतन्यामुळे आध्यात्मिक त्रास नष्ट होऊन ‘शरीर म्हणजे जणू देवीचे देऊळ आहे’, अशी अनुभूती येणे

एकदा मला पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सांगितले, ‘‘आपल्या शरिरात देवीतत्त्व आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कोणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

देवाने आपल्याला सुदृढ आणि सक्षम अवयव दिले आहेत. त्यासाठी आपण सतत देवाच्या चरणी कृतज्ञ राहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ –  (परात्पर   गुरु) डॉ. आठवले

रामनाथी आश्रमात येतांनाच्या प्रवासात नामजप करतांना सूक्ष्मातून भगवान शिवाचे दर्शन होणे आणि रामनाथी आश्रमात पोचल्यावर प्रवासात शिवाचे दर्शन होण्याचा उलगडा होणे

१६.६.२०१८ या दिवशी मी आगगाडीने रामनाथी आश्रमात येत होते. त्या वेळी प्रवासात नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘मी एका जिन्यावरून कुठेतरी उंच उंच जात आहे आणि माझ्यापुढे भगवान शिव आहे…