मनाच्या मंदिरात नित्य गुरूंना स्मरावे ।

साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. दीपक छत्रे

शारदेच्या कृपाप्रसादे ।
पदबंधांत लाघव यावे ।
प.पू. माऊलींच्या चरणी ।
काव्यपुष्प अर्पण व्हावे ॥ १ ॥

भावनांत बहु रंगलो ।
भावसरींत चिंब भिजलो ।
हरिभजनाविण काळ न जावा ।
मनाचे मंदिर बनावे ॥ २ ॥

कलंक मतीचा झडो लवकरी ।
संतवचनांच्या आश्रयास जावे ।
पामरास या इतुकेच ठावे ।
गुरुचरणांना नित्य स्मरावे ॥ ३ ॥

माऊली तुझे विश्‍वरूप ।
डोळ्यांत कसे साठवावे ।
अद्वैताचे मज भान येऊनी ।
चराचरात तुला पहावे ॥ ४ ॥

त्वमेव माता हेच आता ।
जीवनाचे मम ब्रीद ठरावे ।
पंचप्राणांच्या आरतीने ।
माऊली तुज ओवाळावे ॥ ५ ॥

(‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विष्णुतत्त्व जागृती सोहळा’ पाहिल्यानंतर साधकाला स्फुरलेले काव्य)

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (११.१२.२०१९)