रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना साधिकेला अन्नपूर्णामाता श्री दत्तात्रेयांना भिक्षा देत असल्याचे दृश्य दिसून देवाने सूक्ष्मातून त्याचा अर्थ सांगणे

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

‘२.५.२०१९ या दिवशी दुपारी मी रामनाथी आश्रमात प्रवेश करत असत असतांना मला ‘श्री अन्नपूर्णामाता श्री दत्तात्रेयांना भिक्षा देत आहे’, असे दृश्य दिसले. हे दृश्य दिसल्यानंतर ‘साधना करणारे साधक आणि साधूसंत यांना अन्नाची कमतरता पडू नये अन् त्यांना साधना करण्यासाठी शक्ती आणि चैतन्य मिळावे, यासाठी अन्नपूर्णामाता दत्तगुरूंना भिक्षा देत आहे’, असे मला देवाने सांगितले.’

– कु़. दीपाली गोवेकर, फोंडा, गोवा. (मे २०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक