नाम घेतले, तर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो !
आपले जीवन व्यवहारातील बर्या-वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते; परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली, म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी रहातो, त्याप्रमाणे कोणतेही काम करतांना नाम घेतले, तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो.