परमेश्वराचे प्रेम वा दर्शन यांविना जीवन यांत्रिकच !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

परमेश्वराचे प्रेम नसेल, परमेश्वर दर्शनाची ओढ नसेल, परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान नसेल, तर मग कोणत्याच साधनांना यश येत नाही. केलेले प्रयत्न वाया जातात. उगीच ‘काया व्यर्थ शिणली’, अशी जाणीव बोचत राहून मनुष्य परमार्थापासून दुरावतो आणि मग शरिराने जे करत रहातो, ते लादलेले ओझे रटाळपणे ओढत नेल्यासारखे, वरवरचे, केवळ यांत्रिक स्वरूपाचे होते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती  (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)