इंद्रियांना असणारी विषयाची ओढ !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

इंद्रियांना असणारी विषयाची ओढ ही आसक्तीचे रूप घेऊन नानाविध चाळे करते; म्हणून तर काय पहावे ? काय ऐकावे ? हे निरनिराळ्या पातळीवर सांगण्याचा प्रसंग येतो. ‘ईश्वराचे श्यामसुंदर रूप डोळ्यांना दिसावे’, ‘संतचरित्राच्या वा संतवचनांच्या श्रवणाने कान तृप्त व्हावेत’, असे कधी उत्कटतेने वाटते का ? असे वाटत नाही. क्वचित् वाटले, तर ती ओढ टिकत नाही; म्हणून तर ज्ञानेंद्रियांचा धिक्कार करण्याचा प्रसंग येतो.  – प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘आत्मसंयम योग’)