पुरुषांचे वर्ग आणि प्रकार

प.पू. स्वामी वरदानंद भारती

स्वत: श्रद्धावंत असणे आणि श्रद्धेचा पुरस्कार करणे, हा माझ्या मते श्रेष्ठ पुरुष; स्वत:ची श्रद्धा नसली, तरी श्रद्धावंतांचा बुद्धीभेद न करणारा हा माझ्या मते मध्यम पुरुष; स्वत:ची श्रद्धा आणि दुसर्‍यांच्या श्रद्धा याविषयांची टर उडवतो, तो कनिष्ठ पुरुष आणि स्वत:वर प्रसंग आला, म्हणजे अशी श्रद्धामय कर्मकांडे नैमित्तिकरित्या पाळतो, त्यासाठी कधी कधी नातेवाइकांची ढाल पुढे करतो आणि इतरांच्या श्रद्धाविषयांवर मात्र बिनधास्तपणे प्रहार करत असतो, हा माझ्या मते अधम पुरुष ! तिसर्‍या वर्गातील पुरुष फार क्वचित् भेटतात; कारण संपूर्ण अश्रद्ध असणे, हे पूर्णपणे सश्रद्ध असण्यापेक्षाही अधिक अवघड आहे. त्यामुळे बहुधा भेटतात, ते चौथ्या वर्गातील ! ज्याला जीवन जगावयाचे आहे, त्याने चौथ्या वर्गातील व्यक्तीच्या वाचाळपणाकडे लक्ष देण्याचे काहीच कारण नाही. आपली श्रद्धा धीटपणे प्रगट करण्यात सामान्य व्यक्तीला या चौथ्या वर्गातील वावदुकाचे (वाचाळविराचे) उगीचच भय वाटत असते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘अप्रकाशित वाङ्मय’ या ग्रंथातून)