
गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला, तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल. पूर्वपुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान; पण अगदी स्वच्छ असतो. पुढे त्या स्वच्छ झर्याचे नदीत रूपांतर होते आणि अनेक ठिकाणांहून वहात आल्याने तिचे पाणीही काहीसे गढूळ बनते, तसेच आपले जीवनही व्यवहारातील बर्या-वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते; परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली, म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी रहातो, त्याप्रमाणे कोणतेही काम करतांना नाम घेतले, तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज