
परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण असला, तरी तो देवाकडे जातो, हे लक्षात ठेवावे. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भीतीच नाही. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे; म्हणून ते काय सांगतात, ते पहावे. परमात्म्याची ज्याने ओळख होते, ते ज्ञान ! अन्य ज्ञान हे केवळ शब्दांचे अवडंबरच होय ! परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही, तर भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज