विवाहाच्या वेळी स्त्रीचे नाव पालटल्याने तिचा अहंभाव न्यून होऊन तिला विवाहाचे आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण फळ प्राप्त होऊ शकते !

‘अध्यात्मशास्त्रानुसार पुण्यवान पुरुषाची पुण्यकर्मे आणि साधना करणार्‍या पुरुषाची साधना यांचे अर्धे फळ त्याच्या पत्नीला मिळते. या फलप्राप्तीमुळे तिच्या जीवनाचे कल्याण होते; मात्र त्यासाठी तिने तिच्या पतीशी अधिकाधिक एकरूप होणे आवश्यक आहे.

सुश्री सुप्रिया नवरंगे

त्याकरता तिने ‘स्वतःचे नाव, तसेच माहेरचे आडनाव यांचा त्याग करणे, पतीच्या कुटुंबियांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे’, इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या साध्य झाल्यास स्त्रीचा अहंभाव न्यून होऊन तिला विवाहाचे आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण फळ प्राप्त होऊ शकते. यावरून आपल्या हेही लक्षात येते की, स्त्रीने पतीशी आणि त्याच्या कुटुंबियांशी एकरूप होणे, हे तिला आध्यात्मिक स्तरावर लाभ देणारे आहे.’

– सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२४)