उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर आणि नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

सत्सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो आणि सेवा करतच रहावीशी वाटते ! – शिबिरार्थींचे मनोगत

शिबिरात मार्गदर्शन करतांना धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमूलाग्र पालट होतात, हे प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वाविषयी अतिशय स्पष्ट विचार मांडले जातात ! – पू. भास्करगिरि महाराज, मठाधिपती, दत्त देवस्थान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिनांक १२ आणि १३ मार्च या दिवशी नगर जिल्ह्यातील देवगड येथे नगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

धुळे येथे दोन दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा पार पडली !

ज्ञानशक्तीचा लाभ घेऊन जीवनाचे सार्थक करून घ्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे’ उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार या गावात करण्यात आले. हे ग्रंथालय ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले पुणे येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच हा सोहळा पहातांना त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवणार्‍या सौ. छाया गणेश देशपांडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

आध्यात्मिक पातळी घोषित होणे ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा ! माझी आध्यात्मिक पातळी घोषित होणे, ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा आहे. प्रत्यक्षात माझे काहीच प्रयत्न नाहीत. त्यामुळेच हे सर्व देवानेच करून घेतले आहे.

संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी ! धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात ही घोषणा केली.

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !