‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले पुणे येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच हा सोहळा पहातांना त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु नंदकुमार जाधव

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे मार्गदर्शन ऐकल्यावर जाणवलेली सूत्रे

सौ. सुप्रिया पवार, कोथरूड, पुणे.

साधनेचे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळणे : ‘सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचे मार्गदर्शन ऐकतांना ‘मी रामनाथी आश्रमात आहे आणि परात्पर गुरु डॉक्टर, सर्व सद्गुरु आणि संत यांच्यासमोर बसून मी प्रवचन ऐकत आहे’, असे मला वाटले. ‘मार्गदर्शन संपू नये’, असे मला वाटत होते. मला पुष्कळ दिवस आधीपासून साधना समजली होती; पण प्रयत्न करण्यास मी पुष्कळ अल्प पडले’, याची मला जाणीव झाली. आता मी मनापासून प्रयत्न करीन.’

सौ. सुनीता सुक्रे, कोथरूड, पुणे.

‘स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि नामजप वाढवायला हवा’, याची जाणीव होणे : ‘सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचे मार्गदर्शन ऐकल्यावर ‘माझ्याकडून अल्प प्रयत्न होतात’, याची मला जाणीव झाली. मला पुष्कळ सकारात्मकता वाटली. ‘स्वभावदोषांवर प्रयत्न करायला हवेत आणि नामजप वाढवायला हवा’, याची मला जाणीव झाली.’

सौ. कीर्ती महाजन, वाचक, कोथरूड, पुणे.

साधनेत अल्प पडत असल्याची जाणीव होणे : ‘सद्गुरु जाधवकाकांनी स्वभावदोष निर्मूलनावर केलेले मार्गदर्शन अनमोल होते. ‘मी पुष्कळ अल्प पडत आहे’, याची मला जाणीव झाली. त्या दिवशी माझ्याकडून झालेली एक चूक माझ्या लक्षात आली. मी ती चूक स्वभावदोष लिखाणाच्या सारणीत लिहिली.’

सोहळा बघतांना आलेल्या अनुभूती

सौ. प्रियवंदा गळकट्टे, कोथरूड, पुणे

‘सोहळा चालू असतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. समोर श्रीकृष्ण दिसत होता. मी देवाला मनातील गार्‍हाणे सांगितले. माझे मन प्रसन्न झाले.’

सौ. मनीषा शिंदे, कोथरूड, पुणे.

‘सत्संग सोहळा चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत मला घरातील भिंतींवर सर्व देवतांचे दर्शन झाले. सोहळा संपल्यानंतर देवतांचे दर्शन होणे बंद झाले.’

सौ. अक्षदा नारकर, हितचिंतक, कोथरूड, पुणे.

‘सत्संगाच्या आरंभापासून ते सत्संग संपेपर्यंत माझा नामजप चालू होता. ‘या सत्संगातून साधनेत पुढे जाण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवे ?’, ते मला समजले. ‘सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले बोलत आहेत’, असे मला जाणवले. मला सत्संगात चैतन्य जाणवले.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक