सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा जाधव यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.
असे एक साधे सरळ व्यक्तीमत्त्व ।
परि करीत असती सेवा प्रामाणिक ।। १ ।।
अंगी असती विविध गुण त्यामुळे होतात सर्वांचे प्रिय ।
शाळेत होते विद्यार्थ्यांना आवडणारे शिक्षक ।। २ ।।
आपल्या गोड आवाजाने म्हणती गाणी ।
मंत्रून टाकती सर्वांना डोळ्यांत येत असे पाणी ।। ३ ।।
घरातील लहान मोठ्यांचा आदर करीत कर्तव्ये केली पार ।
कधी न पाहिले स्वत:कडे सोसले किती कष्ट ।। ४ ।।
परिस्थितीतूनच भेटतो देव तसा मिळाला सत्संग ।
लावली त्याने (सत्संगाने) नामाची अन् सेवेची गोडी ।। ५ ।।
सेवा करीती तळमळीने आणि श्रद्धेने ।
म्हणून देवाने सोडवले जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतूनी ।। ६ ।।
सेवेला जात असती विविध शहरी ।
केली नाही काळजी कशाची ।। ७ ।।
झाली कृपा गुरुदेवांची केले त्यांना संत ।
झाले जन्माचे सार्थक पोचवले सद्गुरुपदी ।। ८ ।।
गुरुदेवांकडे असे संतरत्नांची खाण ।
त्यातील एक सदगुरु जाधवकाका ।। ९ ।।
– सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी. (१८.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |