जेव्हा रशियाला स्वतःच्या अस्तित्वाचा धोका जाणवेल, तेव्हा अण्वस्त्रांचा वापर होईल ! – रशिया

‘पुतिन आण्विक शस्त्रांचा वापर करणार नाही, यावर पूर्ण विश्‍वास आहे का ?’ असा प्रश्‍न रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

रशियामध्ये साखरेच्या खरेदीवरून होत आहेत भांडणे !

गेल्या २८ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा युक्रेनच्या नागरिकांवर जसा गंभीर परिणाम झाला आहे, तसा आता रशियाच्याही नागरिकांवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले.

(म्हणे) ‘रशियाच्या संदर्भात भारताची भूमिका अस्थिर !’ – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन

एखाद्याला आधी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि नंतर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर त्याला साहाय्य न करता मरण्यासाठी सोडून देऊन त्याचा विश्‍वासघात करायचा, अशी कृती भारताने कधी केली नाही, हे बायडेन यांना भारताने सुनावले पाहिजे !

खरसॉन शहरात रशियन सैन्याने निःशस्त्र आंदोलकांवर गोळीबार केल्याचा युक्रेनचा आरोप

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत गोळीबाराच्या वेळी नागरिक जीव वाचवण्यासाठी पळापळ करतांना दिसत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या सेवेतील १ सहस्र कर्मचारी पालटले !

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःची हत्या होण्याच्या भीतीने त्यांच्या सेवेत असलेले १ सहस्र कर्मचारी पालटले. त्यांच्या जागी नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

युक्रेनमध्ये असलेला युरोपमधील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प रशियाच्या आक्रमणात उद्ध्वस्त !

युक्रेनच्या मारियुपोलमध्ये असलेला युरोपमधील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प कह्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्याकडून प्रयत्न केला जात आहे. रशियन सैन्याच्या आक्रमणात हा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध : माहिती युद्धाचा प्रत्यक्ष युद्धावरील परिणाम !

युक्रेनच्या जनतेला घाबरवण्यासाठी ‘रशिया आपल्यावर आक्रमण करणार आहे’, असा आभास निर्माण करायचा. ज्यामुळे ते त्यांच्या सरकारच्या विरोधात जातील; परंतु तसे झाले नाही. याउलट युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की हे युक्रेनचे नायक बनले.

रशिया ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळा पडण्याची शक्यता !

रशियावर नवीन निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने अमेरिका रशियाला इंटरनेटद्वारे ठिकाण दर्शवणारे ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळे पाडण्याची शक्यता आहे.

जपान रशियावर प्रतिबंध घालण्यासाठी भारतावर दबाव टाकवणार !

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौर्‍यावर आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.