रशिया ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळा पडण्याची शक्यता !

मॉस्को – रशियावर नवीन निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने अमेरिका रशियाला इंटरनेटद्वारे ठिकाण दर्शवणारे ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळे पाडण्याची शक्यता आहे, असे मत ‘रॉसकॉस्मॉस’ या रशियन अंतराळ संस्थेचे अध्यक्ष दिमित्री रॉगॉझिन यांनी व्यक्त केले आहे. असे असले, तरी रशियन नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण रशियाकडे स्वत:चे ‘ग्लोनॅस’ नावाचे ‘जी.पी.एस्.’ तंत्रज्ञान आहे, असेही ते म्हणाले.