रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अणूबाँब टाकण्याचा प्रयत्न करू शकतात ! – अमेरिकेची भीती

रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला उद्ध्वस्त

भारताला तेलाच्या आयातीच्या संदर्भात पाश्‍चात्त्य देशांनी सल्ला देऊ नये ! – भारताने सुनावले

भारताने म्हटले आहे, ‘तेल संपन्न असलेले देश किंवा रशियामधून तेलाची आयात करणारे देश प्रतिबंधात्मक व्यापाराचे समर्थन करू शकत नाहीत. त्यामुळे भारताच्या इंधन व्यवहारांचे राजकारण केले जाऊ नये.’

रशियाचा वेध घेण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनचा वापर !

रशियाचा वेध घेण्यासाठी युक्रेनचा दुर्बिण म्हणून वापर करायचा होता, यासाठी युक्रेनला ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) राष्ट्रांमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका दबाव टाकत राहिली. रशियाच्या सीमेवरती अमेरिकेला ‘नाटो’च्या माध्यमातून लष्करी तळ उभारायचा होता.

युक्रेनच्या ऐतिहासिक शहर लिविवजवळ रशियाकडून क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

लिविव हे ऐतिहासिक शहर असून त्याच्याजवळ करण्यात आलेले हे आक्रमण गंभीर असल्याचे मानले जात आहे.

(म्हणे) ‘भारताने रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले, तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील !’

अमेरिकेची भारताला अप्रत्यक्ष धमकी
स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणार्‍या अमेरिकेने ‘भारताने काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याची आवश्यकता नाही !

रशियाकडे केवळ १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक ! – अमेरिकेच्या माजी सैन्यदल प्रमुखाचा दावा

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.

रशियाकडून युद्धाच्या २० व्या दिवशीही युक्रेनवर आक्रमणे चालूच !

रशियाकडून येथील रहिवासी इमराती आणि एक मेट्रो स्थानक यांवर १५ मार्चच्या सकाळी हवाई आक्रमणे करण्यात आली. एका इमारतीवर केलेल्या आक्रमणात २ जण ठार झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.

युद्ध चालू आहे !

भारताने पोखरणमध्ये दुसर्‍यांदा अणूबाँबचे परीक्षण केल्यावर जगाने भारतावर, विशेष करून अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले; मात्र त्याचा भारतावर विशेष काही परिणाम झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तसेच रशियाचे झाल्यास आश्चर्य वाटू नये. रशियाकडे इंधन आणि गॅस हे हुकूमाचे एक्के आहेत. त्यांच्या बळावरच रशिया अमेरिका आणि युरोप यांना खेळवणार आहे, हे नक्की !

रशियाला साहाय्य केल्यास कठोर कारवाई करू ! – अमेरिकेची चीनला धमकी

जर रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या संदर्भात चीनने रशियाला साहाय्य केले, तर चीनवर कठोर कारवाई करू, अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे.

रशिया लवकरच ‘नाटो’च्या सदस्य देशांवरही आक्रमण करील ! – युक्रेनची चेतावणी

या वेळी झेलेंस्की यांनी पुन्हा एकदा ‘नॉटो’ने रशियासाठी ‘नो फ्लाय झोन’ (प्रतिबंधित हवाई क्षेत्र) घोषित करण्याचा पुनरूच्चार केला. युक्रेनची ही मागणी यापूर्वी ‘नाटो’ने फेटाळली होती.