अमेरिकेत ‘जय’शंकर ! 

‘आम्ही जगाला हवे तसे आमच्या तालावर नाचवणार’, अशी जागतिक राजकारणात अमेरिकेची मानसिकता दिसून येते. ‘या धोरणापुढे भारतानेही मान तुकवावी’, असे अमेरिकेला वाटते. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेलाच सुनावले, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर कौतुकास पात्र आहेत.

रशिया-चीन यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ !

उभय देशांमधील व्यापार पाहिला, तर गेल्या तिमाहीत यामध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे रशियाची सरकारी वृत्तवाहिनी ‘रशिया टुडे’ने म्हटले आहे. यामुळे आर्थिक जग विभागले जात असल्याचे आणि त्यातून नवीन समीकरणे सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिका युक्रेनला आणखी ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे पाठवणार !

‘रशियाने आक्रमण केल्यास अमेरिका साहाय्य करील’, असे सांगणार्‍या अमेरिकेने युद्ध चालू झाल्यावर युक्रेनला एकटे सोडले. त्यामुळे अमेरिकेने युक्रेनला कितीही साहाय्य केले, तरी ते वरवरचेच असणार आहे, हे लक्षात घ्या !

भारत एक मास पुरेल इतके तेल आयात करतो, तर तितकेच तेल युरोप रशियाकडून अर्ध्या दिवसात घेतो !

भारताने पाश्‍चात्त्य राष्ट्रांना सुनावले !
अमेरिकेचे भारताला रशियासमवेत शस्त्रकरार न करण्याचे आवाहन

युरोपियन युनियनने रशियन तेलावर घातली संपूर्ण बंदी !

युरोपियन युनियनच्या संसदेने रशियाकडून आयात केले जाणारे तेल, कोळसा, परमाणू इंधन आणि गॅस या उत्पादनांवर संपूर्ण बंदी लादण्यात आल्याचे घोषित केले. संसदेत यासंदर्भातील ठराव संमत करण्यात आला.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित !

रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला.

अमेरिकेकडून पुतिन यांच्या दोन्ही मुलींवर निर्बंध !

रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन तब्बल दीड मास होत आला असून आता अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यास आरंभ केला आहे.

रशियाला होत असलेली विविध प्रकारची हानी आणि त्याच्या सैन्याची कामगिरी !

रशियाचे सैन्य हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सर्वकाही आहे; परंतु युक्रेनशी चालू असलेल्या युद्धातून त्यांना जे मिळवायचे होते, ते अद्यापही प्राप्त झालेले नाही. ज्या चुका रशिया, नाटो, युरोपीय राष्ट्रे आणि काही चुका युक्रेन करत आहे, त्यापासून भारताला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.

हंगेरीकडून निर्बंधांकडे दुर्लक्ष करत रशियाकडून तेल खरेदीचा निर्णय

हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, ‘जर रशियाने त्यांना रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितले, तर तसे केले जाईल.’

बुचा शहरामध्ये आम्ही नरसंहार केला नाही ! – रशियाचा दावा

मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे-रशिया