सातारा जिल्ह्यात युक्रेनमधून ५ विद्यार्थी सुखरूप परतले !
युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातून वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी १९ विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी ५ विद्यार्थी आतापर्यंत सातारा जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत.
युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातून वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी १९ विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी ५ विद्यार्थी आतापर्यंत सातारा जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत.
रशियाने जर युक्रेनमध्ये ‘व्हॅक्युम बाँब’ वापरला असेल, तर ते अतिशय चुकीचे आहे; कारण आंतरराष्ट्रीय कायदा एवढा मोठा विध्वंसक बाँब वापरण्याची अनुमती देत नाही. त्यामुळे रशियाची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुद्ध आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा चालू होण्यासाठी अशी विनंती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला केली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला ७ दिवस होत आलेले असतांना अद्याप रशियाला विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे जगभरातून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.
युक्रेनमधील खारकीव आणि खेरसन येथे मध्यरात्री भीषण लढाई चालू होती. रशियाच्या सैनिकांनी खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर ‘पॅराट्रूपर्स’ उतरवले आणि जोरदार आक्रमण केले.
रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेले युद्ध हे भारतात मोगलांनी राजपूतांच्या विरोधात घडवलेल्या नरसंहारासारखे आहे, असे विधान युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केले.
भारताने रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतली असली, तरी भारताच्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एस्.बी.आय.) या राष्ट्रीयकृत बँकेने रशियाच्या बँकांशी कोणतेही व्यवहार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे.
रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली, तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.