पुतिन यांचे कुटुंब सायबेरियामधील छावणीत लपले !

रशियामधील ‘मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन’चे प्राध्यापक वालेरी सोलोवी यांच्या दाव्यानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये असलेल्या छावणीमध्ये लपवले आहे.

भारतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जातीयवाद आणि लाचखोरी, यांमुळे हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात जातात !

युक्रेनमध्ये काही लाख रुपयांमध्ये वैद्यकीय शिक्षण मिळत असेल, तर भारतात कोट्यवधी रुपये का खर्च करावे ? – रशियन हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे पिता

रशियाकडून युक्रेनच्या सैन्यतळावर झालेल्या आक्रमणात ७० सैनिक ठार

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले. यात युक्रेनचे ७० हून अधिक सैनिक ठार झाले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाचा भारतियांसाठी बोध !

भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ’, अशी स्थिती आहे. लयाची देवता असलेल्या महादेवाची उपासना करणारे भारतीय खरे तर देव, अवतारी संत आणि ऋषिमुनी यांच्या कृपेमुळेच तरून जात आहेत. येत्या युद्धकाळातही भक्त तर तरून जाणारच; तरीही भारतियांनी सर्व स्तरांवर स्वतःची सिद्धता ठेवणे श्रेयस्कर !

रशिया-युक्रेन युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी आणि भारताने करावयाची पूर्वसिद्धता !

या युद्धापासून भारताला शिकता येईल की, अनेक मित्र राष्ट्र करार करून ‘आम्ही तुम्हाला साहाय्य करू’, असे सांगतात; पण वेळ पडली, तर ते साहाय्य करतीलच, असे नाही. त्यामुळे आपण संरक्षणामध्ये आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि सर्व मोठी शस्त्रे ही भारतातच बनवली पाहिजेत, याला पर्याय नाही.’

युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेन देत असलेला लढा !

‘रशियाच्या सैन्याच्या हातात आपली (युक्रेनची) राजधानी पडायला नको. त्यामुळे सर्व नागरिकांनी हातात शस्त्र घेऊन या लढाईमध्ये सहभागी व्हावे’, असे आवाहन झेलेंस्की यांनी केले. सध्या तरी रशियाचे आक्रमण थोपवण्यास युक्रेनच्या सैन्याला यश मिळाले आहे.

युक्रेनमधील रुग्णालयांत प्राणवायुचा (ऑक्सीजनचा) मोठा तुटवडा

या तुटवड्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली असून ‘जर युक्रेनमधील रुग्णालयांत त्वरित प्राणवायु उपलब्ध करून दिला नाही, तर मोठा अनर्थ घडू शकतो’, अशी भीती व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार !

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.

तुम्ही आमच्या समवेत आहात, हे सिद्ध करा !

आम्ही आमची भूमी आणि स्वातंत्र्य यांच्यासाठी लढत आहोेत. आमची सर्व शहरे अद्यापही अजेय आहेत. कुणीही ती भेदू शकणार नाहीत. आम्ही भक्कम आहोत. युक्रेनचे मनोबल खचलेले नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा ! – युक्रेनच्या राजदूतांचे शिवभक्तांना आवाहन

‘युक्रेनमधील स्थिती सुधारावी, तेथील युद्ध समाप्त व्हावे’, असेच सहिष्णु भारतियांना वाटते. भारतातील शिवभक्तांना असे आवाहन करतांना युक्रेनच्या राजदूतांनी ‘युक्रेन नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका का घेतो ?’, याचेही उत्तर द्यावे !