सातारा जिल्ह्यात युक्रेनमधून ५ विद्यार्थी सुखरूप परतले !

सातारा, ३ मार्च (वार्ता.) – युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातून वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी १९ विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी ५ विद्यार्थी आतापर्यंत सातारा जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमधील गुंडापेस्ट, हंगेरी, पोलंड, रोमानिया याठिकाणी असणार्‍या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत होते. युक्रेनमधून ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत कराड तालुक्यातील साद अमीर शेख, कौस्तुभ विनोद पाटील, माण तालुक्यातील मनोज दादासाहेब कदम, सातारा शहरातील शार्दुल हेमंतकुमार जाधव, हर्षवर्धन किशोर शिंदे यांना भारतामध्ये आणण्यात आले. त्यानंतर २ मार्च या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पाचही विद्यार्थी सुखरूप घरी पोचले आहेत.