नवी देहली – भारताने रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतली असली, तरी भारताच्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (एस्.बी.आय.) या राष्ट्रीयकृत बँकेने रशियाच्या बँकांशी कोणतेही व्यवहार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
१. एस्.बी.आय.ने याविषयी तिच्या काही ग्राहकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, अमेरिका, युरोपीयन युनियन किंवा संयुक्त राष्ट्रे यांनी ज्या संस्था, बँका, बंदरे किंवा नौका यांवर निर्बंध लादले आहेत, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार किंवा हस्तांतरण केले जाणार नाहीत.
२. एस्.बी.आय.च्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आम्ही एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आहोत. यामुळे त्यांच्या न्यायाधिकार क्षेत्रात येणार्या सर्व नियमांचे पालन करण्याची आम्हाला आवश्यकता आहे. अन्यथा आम्हाला हे नियम पाळले नाहीत म्हणून तशा प्रकारे पाहिले जाऊ शकते.