आता युक्रेनकडूनही रशियाच्या सैनिकांवर अत्याचार !

युक्रेनच्या बुचा शहरामध्ये रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचा नरसंहार केल्याच्या घटनेनंतर आता युक्रेनच्या सैनिकांनीही रशियाला प्रत्युत्तर  दिले आहे. कीव येथील एका गावामध्ये पकडण्यात आलेल्या रशियाच्या सैनिकांना अमानुषपणे ठार मारण्यात आले. याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.

रशियावर तात्काळ कार्यवाही करा किंवा संघटनेला विसर्जित करा !

संयुक्त राष्ट्रांनी जगातील एकतरी समस्या सोडवली आहे का ? भारताने काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेऊन ७४ वर्षे झाली आहेत; मात्र त्यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे ‘झेलेंस्की यांना जे वाटते, तेच आता करण्याची आवश्यकता आहे’, अशी आता जगभरातून मागणी झाली पाहिजे.

‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !

लोकशाही राष्ट्रांना मारक ठरणार्‍या चीनला ‘नाटो’ लक्ष्य करणार !

चीनने रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा निषेध न केल्याने ‘नाटो’ नाराज असल्याचे त्याचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले.

बुचा शहरामध्ये आम्ही नरसंहार केला नाही ! – रशियाचा दावा

मृतदेहांची जी भयावह छायाचित्रे समोर आली आहेत, ती बनावट आहेत. रशियाच्या सैन्याला अपकीर्त करण्यासाठी युक्रेनकडून हे केले जात आहे-रशिया

रशियाच्या सैनिकांकडून निरपराध नागरिकांच्या हत्या ! – युक्रेनचा आरोप

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या ४० व्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवरील भागापासून पुन्हा माघारी जात आहे; मात्र माघारी जातांना त्यांच्याकडून युक्रेनच्या नागरिकांच्या हत्या केल्याचे युक्रेनच्या सैनिकांना आढळून आले आहे.

अमेरिकी डॉलरचे जागतिक स्तरावरील वर्चस्व धोक्यात ! – अमेरिकी बँक

ज्याप्रकारे गेल्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनच्या पाऊंडवरील जगाचा विश्‍वास अल्प होऊन त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली, त्याप्रकारे आता अमेरिकी डॉलरची स्थिती होण्याची चिन्हे आहेत.

जर्मनीने ३० वर्षांत गाठला महागाईचा उच्चांक !

कोरोना महामारी, तसेच रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीविषयी असलेली संभ्रमाची स्थिती यांमुळे जर्मनीत रहाण्याचा खर्च वाढला आहे. मार्च २०२२ चा महागाई दर हा गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी अधिक असू शकतो.

रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे ‘डॉलर’ आणि ‘युरो’ यांना फटका ! – रशियाचा दावा

अनेक दशके अमेरिकी डॉलर हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले होते; परंतु यापुढे त्याला उतरती कळा लागेल.

ब्रिटनला यापुढे ‘रशियन गॅस’चा पुरवठा करणार नाही ! – रशिया

युरोपीय देश रशियाचे कच्चे तेल आणि गॅस यांवर अवलंबून असल्याने रशियाची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.