ब्रिटनला यापुढे ‘रशियन गॅस’चा पुरवठा करणार नाही ! – रशिया

मॉस्को (रशिया) – ब्रिटनने अमेरिकेच्याही पुढे जाऊन आमच्यावर सर्वाधिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे यापुढे ब्रिटेनला आम्ही ‘रशियन गॅस’चा (‘नैसर्गिक वायू’चा) पुरवठा करणार नाही, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे माध्यम सचिव दिमित्री पेस्कोव यांनी केली.

यामुळे ब्रिटेनचे तेल आणि वायू यांच्याशी संबंधित जगप्रसिद्ध ‘शेल’ हे आस्थापन आता रशियाच्या वायूला मुकणार आहे. अनेक युरोपीय देश रशियाचे कच्चे तेल आणि गॅस यांवर अवलंबून असल्याने रशियाची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.