नाशिक येथे नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३१ खासगी बसचालकांवर कारवाई !

खासगी बसचालकांच्या मनमानीला चाप बसण्यासाठी पोलिसांनी नियमितपणे वाहनांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून वाटाण्याच्या अक्षता !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ ! भरमसाठ तिकीटदर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे जनविरोधी रूप उघड !

तिकीट बुकींग केंद्रांवर शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा !

‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

सणांच्या काळात प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आदेश !

सणांच्या काळामध्ये प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश काढला आहे. अवाच्या सवा दर आकारून लूट करत असल्यास तक्रार प्रविष्ट करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांकही घोषित केला आहे.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते.

खासगी ट्रॅव्हल्समालकांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी वर्धा येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

सण, उत्सव आणि शालेय सुटी या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्समालकांकडून तिकिटांचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याला प्रतिबंध घालण्यासंदर्भात परिवहन विभागाने राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आदेश दिले आहेत.

मद्यालयात दारू पिणार्‍या वाहनचालकाला सुरक्षितपणे घरी पोचवण्याचे दायित्व मद्यालय मालकाचे ! – मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री, गोवा

यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

‘पुणे महानगर परिवहन’ला प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये ठेकेदारांना द्यावे लागतात !

पी.एम्.पी.ला (‘पुणे महानगर परिवहन’ला) प्रतिदिन १ कोटी ५० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातील ९० लाख रुपये हे ठेकेदारांच्या बसमधून मिळतात; पण ठेकेदारांच्या ८५० बसगाड्यांसाठी पी.एम्.पी.लाच १ कोटी ५० लाख रुपये भाडे द्यावे लागते.

अवाजवी तिकीट दर आकारणार्‍या खासगी कंत्राटी वाहतूकदारांवर कारवाई करा ! – उपप्रादेशिक परिवहन विभाग, रत्नागिरी

ज्याप्रमाणे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली, तशी कारवाई राज्यातील अन्यत्रच्या विभागांनीही करावी !

सोलापूर परिवहन विभागाच्या निविदा प्रक्रियेस दोन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद नाही !

सोलापूर परिवहन विभाग तोट्यात असल्याने यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होतो. त्यानुसार त्यातील २७ मार्गांवर खासगी आस्थापनेकडून चालवण्यासाठी महापालिकडून दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र ही निविदा कुणीच भरलेली नाही.