सोलापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापूर विभागातून भाविकांसाठी एकूण अधिकच्या ९० बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. त्या माचणूर, संगोबा, शिंगणापूर, रामलिंग या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत, तर भागवत एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे अधिकच्या २० गाड्या सोडण्यात येत असून प्रत्येकी २० मिनिटाला गाडी सोडण्यात येत आहे, अशी माहिती सोलापूर आगारप्रमुख श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
या वेळी आगारप्रमुख म्हणाले, ‘‘विभागात २० नवीन बसगाड्या आल्या असून त्या लांब पल्ला आणि मध्यम पल्ला या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत, तसेच इलेक्ट्रीक बससाठी ‘चार्जिंग स्टेशन’ उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.’’