नोंदणी न करता ग्राहकांना वाहने दिल्यास कारवाई होणार !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणांमध्ये नोंदणी न झाल्याने अपघातग्रस्त वाहनाला वाहन क्रमांक मिळाला नव्हता. विनानोंदणी आणि विनाक्रमांक यांची ही मोटार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणेकार्यालयाने शहरातील सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहन विक्रेत्यांना वाहनांची नोंदणी झाल्याविना ग्राहकांकडे वाहन न देण्याच्या संदर्भात पत्र पाठवले आहे. तसे न केल्यास कारवाई होईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे. बर्‍याचदा वाहन विक्रेते ग्राहकांच्या दबावाला बळी पडून वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न होताच वाहन ग्राहकाच्या कह्यात देतात; मात्र यापुढे कार्यालयाने कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.