पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील प्रकार !
पनवेल – रेल्वेस्थानक परिसरात बहुउद्देशीय मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम चालू असल्याने तेथे पोलिसांनी रिक्शाचालकांना प्रवेशबंदी केली आहे; पण तरीही रिक्शाचालक तेथे रिक्शा उभ्या करतात. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. रिक्शाचालकांच्या मनमानी कारभाराचा परिणाम चालत येणार्या प्रवाशांवर होतो.
रेल्वेस्थानक परिसरातील रिक्शाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. रात्रीच्या वेळेस अवाजवी भाडे आकारले जाते. (याला पनवेलचा प्रादेशिक परिवहन विभागही उत्तरदायी ! – संपादक)
‘रिक्शाचालक रस्ता अडवून रिक्शा उभी करत असतील, तर पोलीस कर्मचारी बेशिस्त रिक्शाचालकांवर कारवाई नक्की करतील’, असे पनवेल वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले आहे.