अवाजवी तिकीट दर आकारणार्या खासगी कंत्राटी वाहतूकदारांवर कारवाई करा ! – उपप्रादेशिक परिवहन विभाग, रत्नागिरी
ज्याप्रमाणे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली, तशी कारवाई राज्यातील अन्यत्रच्या विभागांनीही करावी !
ज्याप्रमाणे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली, तशी कारवाई राज्यातील अन्यत्रच्या विभागांनीही करावी !
सोलापूर परिवहन विभाग तोट्यात असल्याने यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होतो. त्यानुसार त्यातील २७ मार्गांवर खासगी आस्थापनेकडून चालवण्यासाठी महापालिकडून दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र ही निविदा कुणीच भरलेली नाही.
गणेशोत्सवाच्या कालावधीत भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून भाविकांची आर्थिक लूट चालू आहे. ‘या विरोधात तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी भूमिका घेणार्या मोटार वाहन विभागाने संकेतस्थळावर तक्रार करण्यासाठीची सुविधा बंद ठेवली आहे.
उत्सवाच्या काळात खासगी बसगाड्यांनी प्रवाशांकडून भरमसाठ तिकीट आकारणे, ही जनतेची लूट आहे. अशा प्रकारची लूट वर्षांनुवर्षे चालू असतांना प्रशासन झोपले आहे का कि ही लूट त्याला मान्य आहे ?
आजकाल बाजारात आधुनिक प्रकारचे चाके असलेले लाकडी किंवा लोखंडी जिने मिळतात. शासनाने अशा प्रकारचे दोन किंवा तीन पायर्यांचे चाके असलेले जिने उपलब्ध करण्याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
येथील जुन्या ‘आर्.टी.ओ.’ अधिकार्याच्या स्वाक्षर्या करून एका ‘जेसीबी’ यंत्राची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि दलाल सय्यद शाकेर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा ..
आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जाणार्या आणि येणार्या वारकर्यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतच्या प्रवेशपत्राचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू आहे.
सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही तांत्रिक त्रुटीमुळे ‘ॲप’ २ वर्षे बंद असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?
येथील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून गौडाबाई काळे (वय ७५ वर्षे) ही वृद्ध महिला ठार झाली. मुंबई येथे जाणारी शिवशाही एस्.टी. बस फलाटावर लावण्यात चालक व्यस्त होता. तेवढ्यात ही घटना घडली.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील निवासस्थानी २६ मे या दिवशी सकाळी ६ वाजता अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. मुंबई, रत्नागिरी आणि पुणे येथील ७ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.