सोलापूर, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – सोलापूर परिवहन विभाग तोट्यात असल्याने यापूर्वी महापालिका सभागृहाने खासगीकरण करण्याचा ठराव केला होतो. त्यानुसार त्यातील २७ मार्गांवर खासगी आस्थापनेकडून चालवण्यासाठी महापालिकडून दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती; मात्र ही निविदा कुणीच भरलेली नाही. अगोदरच तोट्यात असलेला परिवहन विभाग कुणीही चालवण्यास सिद्ध नाही. या संदर्भात महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांच्याकडून माहिती घेतली असता ‘सध्या परिवहन विभागाच्या संदर्भात केंद्र शासनाचे काही धोरण ठरत आहे. ते निश्चित झाल्यावर ही निविदा प्रक्रिया राबवली जाईल. नवीन घेण्यात येणार्या गाड्या या डिझेलच्या न घेता त्या ‘इलेक्ट्रिक’च्या घेण्यात याव्यात असे पत्रक यापूर्वीच केंद्र शासनाने काढलेले आहे.’’, अशी माहिती दिली.