वरिष्ठ लिपिकासह दलाल सय्यद शाकेरवर फसवणुकीचा गुन्हा नोंद
बीड – येथील जुन्या ‘आर्.टी.ओ.’ अधिकार्याच्या स्वाक्षर्या करून एका ‘जेसीबी’ यंत्राची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या तक्रारीवरून येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल आणि दलाल सय्यद शाकेर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठ लिपिक डेडवाल या मागील वर्षभरापासून बीड येथील ‘आर्.टी.ओ.’ कार्यालयात कार्यरत आहेत.
डेडवाल आणि सय्यद शाकेर यांनी सिद्ध केलेल्या बनावट कागदपत्रांच्या कामामध्ये लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांची विशेष पडताळणी व्हावी’, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. (उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक आणि दलाल यांच्या कामांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)