चितगांव (बांगलादेश) – येथे एका डेपोत झालेल्या शक्तीशाली स्फोटामुळे लागलेल्या आगीत ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ५ जून या दिवशी घडली. यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Bangladesh: Death toll in Chittagong container depot fire rises to 44
Read @ANI Story |https://t.co/9U8LPUSMxH#Bangladesh #Chittagong #chittagongfire pic.twitter.com/ddZLaOcyfW
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2022
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन पथकातील शेकडो सैनिक, तसेच पोलीस आणि स्वयंसेवकही पोचले आहेत. स्फोटामध्ये अग्नीशमन पथकातील ५ लोकांचाही मृत्यू झाला आहे.