बंगालच्या इस्कॉन मंदिरात उष्णतेमुळे तिघांचा मृत्यू

घटनास्थळ

कोलकाता – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पानीहाटीच्या इस्कॉन मंदिरात आयोजित दंड महोत्सवात उष्णता आणि आर्द्रता यांमुळे १२ जून या दिवशी ३ भाविकांचा मृत्यू झाला. कोरोना महामारीमुळे २ वर्षांनंतर झालेल्या या उत्सवासाठी उसळलेल्या गर्दीमुळे उष्णता आणि आर्द्रता वाढली होती. यामुळे ५० हून अधिक जण आजारीही पडले आहेत. रुग्णालयात  त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सदर महोत्सव रहित करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले.

या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.