रायगड येथे बसला झालेल्या अपघातामध्ये १६ जण घायाळ !

घटनास्थळाचे दृश्य

रायगड – श्रीवर्धन येथून मुंबई येथे निघालेल्या बसला १६ मे या दिवशी साखरोने फाटा येथे अपघात झाला. अपघातामध्ये बस उलटून गाडीतील १६ प्रवासी घायाळ झाले. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे झाला आहे. श्रीवर्धन आगारातील बागमांडले येथून सकाळी १०.१५ वाजता ही बस सुटली होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. घायाळ प्रवाशांतील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.