वांद्रे-वरळी सागरी मार्गावरील अपघातात २ जण ठार !

वांद्रे-वरळी सागरी मार्गावरील अपघात

मुंबई – वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या गंभीर घायाळ व्यक्तीचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. ३० मे या दिवशी झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये अमर मनीष जरीवाला हे या मार्गावरून प्रवास करतांना त्यांच्या गाडीला धडकून पडलेल्या गरुडाचा जीव वाचवण्यासाठी मध्येच उतरले. त्यांच्या समवेत चालक श्याम सुंदर कामत हेही उतरले. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या गाडीने (टॅक्सीने) दोघांनाही धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला.