देहलीतील आगीमध्ये २७ जणांचा मृत्यू

अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून ३ जणांचा मृत्यू !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘प्रोपोलिन गॅस’चा टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. खोपोली येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.

क्युबाची राजधानी हवानात भीषण स्फोट, २२ ठार !

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या क्युबाला मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता !

पावणे (नवी मुंबई) औद्योगिक वसाहतीतील ९ आस्थापनांना भीषण आग

आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ५ अग्नीशमन बंबांद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता.

आस्थापनाच्या अधिकार्‍यांसह कारखान्याच्या कंत्राटदाराच्या विरोधात वेर्णा पोलिसांकडून गुन्हा नोंद

झुआरी अ‍ॅग्रो केमिकल्स आस्थापनातील स्फोट प्रकरणाला संबंधित कंत्राटदार आणि आस्थापनाचे व्यवस्थापन यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे – मंत्री निळकंठ हळर्णकर

दुर्गापूर (बंगाल) येथे विमान वादळात अडकल्याने ४० प्रवासी घायाळ

मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी घायाळ !

शिवछत्रपतींचे कार्य घराघरांत पोचवणे यासाठी अहोरात्र भ्रमण करणारे, तरुणांसह आबालवृद्धांसाठी आदर्श असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी गणपति पेठ येथील श्री गणपति मंदिराजवळ रस्त्यातील खड्ड्यांमुळे सायकलवरून पडून घायाळ झाले आहेत.

तमिळनाडूमध्ये रथयात्रेच्या वेळी विजेचा धक्का लागल्याने ११ जणांना मृत्यू, तर १५ जण घायाळ

रथयात्रेतील रथाच्या कळसाचा संपर्क उघड्या वीजवाहक तारांशी झाल्याने ही घटना घडली.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे १०० गायींचा होरपळून मृत्यू

गाझियाबाद येथील इंदिरापूरम् भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागल्यानंतर त्याचा वणवा शेजारील गोशळेत पोचल्यानंतर तेथील १०० गायींचा  होरपळून मृत्यू झाला. या दुभत्या गायी नसल्याचे श्री कृष्णा गौसेवेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे.

देवघर (झारखंड) येथे ‘रोप-वे’च्या अपघातात दोघांचा मृत्यू

राज्यातील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर ‘रोप-वे’ची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सैन्य, हवाई दल आणि ‘राष्ट्रीय आपत्ती प्रसारण दल’ (‘एन्.डी.आर्.एफ’) हे बचावकार्य करत आहेत. शेवटची बातमी हाती आली, तोपर्यंत १२ भाविकांची सुटका करण्यात आली होती.