रामबन (जम्मू-काश्मीर) येथे निर्माणाधीन बोगदा कोसळला !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील रामबन आणि रामसू या गावांमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत काम करणार्‍या ३ मजुरांची सुटका करण्यात आली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, १० मजूर अजूनही ढिगार्‍यात अडकले आहेत. बचावकार्य चालू आहे.

ही घटना १९ मेच्या रात्री राष्ट्रीय महामार्गाजवळील रामबन जिल्ह्यातील माकेरकोट भागात खूनी नाल्याजवळ घडली. येथे बोगदा बांधला जात आहे. या अपघातात बोगद्यासमोर उभी असलेली वाहने, बुलडोझर, ट्रक यांसह अनेक यंत्रांचीही हानी झाली आहे.