सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

गोव्यात पावसाने ७५ इंचांचा टप्पा ओलांडला !

पेडणे आणि सत्तरी तालुक्यांतील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत सरासरी ८७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक ११३ मि.मी., तर पेडणे येथे ११०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कल्‍याण येथे खड्डे चुकवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !

आणखी किती जणांचे मृत्‍यू झाल्‍यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्‍त महाराष्‍ट्र’ करणार आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पूरसदृश स्थितीमुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. वादळी वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे.

गोव्यात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना चालूच !

राज्यात मुसळधार पावसामुळे झाडे घरे, वाहने यांवर उन्मळून पडणे, घरे कोसळणे यांसारख्या विविध घटना चालू आहेत. संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

कर्णावती (गुजरात) येथे भीषण अपघातात ९ जण ठार, तर १५ जर घायाळ

मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एक गृहरक्षक दलाचा सैनिक यांचा समावेश आहे.

महाराष्‍ट्रात एस्.टी.चे वर्षातील ३६५ दिवसांत ३०५ अपघात !

सदस्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्‍हणाले की, वर्ष २०१७-१८ मध्‍ये शिवशाही बस चालू करण्‍यात आली होती. एस्.टी. महामंडळाच्‍या ९०० बसगाड्या आहेत. भाडे तत्त्वावर २०५ बसगाड्या आहेत

गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

ज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती.

उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू

चमोली येथील अलकनंदा नदीजवळ ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.