ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – मुंब्रा येथील बाह्यवळण रस्त्यावर रसायन घेऊन जाणारा टँकर ९ सप्टेंबरच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उलटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन तो पडला.
टँकरमध्ये २५ टन सल्फ्युरिक ॲसिड होते. टँकरमधून रसायनाचा धूर आणि उग्र वास येत होता. टेक्नोव्हा आस्थापनाचे तज्ञ, अग्नीशमनदलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक यांनी घटनास्थळी पोचून तात्काळ बचावकार्य केले. चालकाच्या डाव्या हाताला आणि कमरेला, तसेच तोंडवळ्याला दुखापत झाली आहे. अपघातामुळे येथील वाहतूक धीम्या गतीने चालू होती.