बलीदानदिनानिमित्त राजगुरुनगर (पुणे) येथे झळकले क्रांतीकारकांच्या देशभक्तीचे फलक !

हुतात्मा स्मारक, भीमा नदीतीरावरील राजगुरु वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी बजरंग दलाच्या वतीने शहरातून प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.

क्रांतीच्‍या घोषणा देत फासावर चढून ‘तेजस्‍वी राष्‍ट्र’ बनवणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु !

आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

शासनकर्त्यांनी केलेले राष्ट्रविरोधी कार्य !

‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. त्यांच्या कार्याला प्रसिद्धी न देणे, त्यांचा साहसी इतिहास दडवून ठेवणे, आदी घृणात्मक कृत्ये करण्यात आली.’

बलाढ्य पोर्तुगीज साम्राज्‍य हादरवून सोडणारी राणी अब्‍बाक्‍का चौटा !

‘आय.सी.जी.एस्. राणी अब्‍बाक्‍का’ हे गस्‍ती जहाजांच्‍या मालिकेतील पहिले जहाज अब्‍बाक्‍का महादेवी यांच्‍या नावावर आहे. तीच जर युरोपियन किंवा अमेरिकन असती, तर शालेय पुस्‍तकांमध्‍ये तिच्‍याविषयी एक अध्‍याय वाचायला मिळाला असता. आश्‍चर्य हेच की, या राणीविषयी आपण अजून काहीच कसे ऐकले नाही !

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या शिक्षेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास लाहोर उच्च न्यायालयाचा नकार  

लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्‍मारक देशवासियांसाठी प्रेरणास्‍थळ ! – रमेश बैस, राज्‍यपाल

क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्‍मारक हे भारताच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे असून देशासाठी भूषणास्‍पद आहे. क्रांतीवीर चापेकर स्‍मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्निमाण करून स्‍मारक देशासाठी प्रेरणास्‍थळ बनवले आहे.

स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये जुन्‍या-नव्‍या पद्धतीचा संगम करावा ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या वढू बु. आणि तुळापूर येथील स्‍मारकाचा विकास करतांना स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये जुन्‍या-नव्‍या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्‍य स्‍वरूपातील आणि दर्जेदार साहित्‍याचा वापर करावा. हुतात्‍मा राजगुरु यांचे राजगुरुनगर येथील स्‍मारकही भव्‍य आणि प्रेरणादायी होईल, असे विकसित करावे, असे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.

खुदीराम बोस यांच्‍यासारख्‍या क्रांतीकारकांची देशभक्‍ती आणि निर्भयता !

क्रांतीकारक खुदीराम बोस यांना इंग्रज न्‍यायाधीश म्‍हणतात, ‘‘तू बाँब बनवून इंग्रज अधिकार्‍यांना मारले आहेस; म्‍हणून आज तुला मृत्‍यूदंड ठोठावण्‍यात येत आहे.’’ निर्णय ऐकतांनाही खुदीराम यांच्‍या चेहर्‍यावर हास्‍य होते.